⚜️उतारा वाचन भाग ६४⚜️


⚜️उतारा वाचन भाग ६४⚜️

   एका गावात गंगा नावाची आजी राहत होती. गंगा आजीला जवळचे नात्याचे असे कोणीच नव्हते. तिला फक्त एकच नातलग ती म्हणजे यमुना. गंगाआजीची गाय. गंगाआजीजवळ शेत नव्हते, त्यामुळे यमुनाच आजीचे पोट भरायची. आजी रानात जायची गवत आणायची. यमुनेला घालायची. मग यमुना भरपूर दूध दयायची. गंगाआजी ते विकायची. मिळालेल्या पैशांत घर चालवायची.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) आजीचे नाव काय होते ?
२) कोणाला जवळचे, नात्याचे नातेवाईक नव्हते ? 
३) आजीचे एकच नातलग कोणते होते ?
४) गंगाआजीच्या गायीचे नाव काय होते ? 
५) गंगा आजीजवळ काय नव्हते ?
६) आजीचे पोट कोण भरायची 
७) आजी कोठे जायची ?
८) आजी रानात कशासाठी जायची ?
९) आजी रानातून काय आणायची ?
१०)आजी गवत कोणासाठी आणायची ?
११) यमुना आजीला काय दयायची ? 
१२) गंगाआजी काय विकायची ?
१३) दूध विकून पैसे कोणाला मिळायचे ? 
१४) गंगाआजी कोठे राहायची ?
१५) 'नातेवाईक' या शब्दाला समानार्थी कोणता शब्द उताऱ्यात आलेला आहे ? 
१६) गायांना आणखी कोणत्या नावाने हाक मारतात. तुम्हांला माहित असलेली गायांची
नावे लिहा.
१७) 'रान' या शब्दासाठी आणखी समानार्थी शब्द लिहा.
१८) 'गाय एक पाळीव प्राणी' या विषयावर पाच ओळी लिहा. १९) तुला माहित असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे लिही.
२०) अनुस्वारयुक्त कोणते शब्द उताऱ्यात आले आहेत ?