⚜️उतारा वाचन भाग ६०⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ६०⚜️

    एका जंगलात एक छोटेसे झाड होते. हिरव्या हिरव्या रंगाचे, लहान लहान फांदयांचे. हवेला त्या झाडाबरोबर बोलायला आवडायचे. चिमणीला त्याच्या फांदीवर बसायला मौज वाटायची. माकडे त्याच्या फांदयावर बसून झोके घ्यायची.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) एक छोटेसे झाड कोठे होते ?
२) झाडाचे वर्णन कसे केले आहे ?
३) झाडाबरोबर कोणाला बोलायला आवडायचे ?
४) झाडाच्या फांदीवर कोणाला बसायची मौज वाटायची ?
५) माकडे कशावर बसून झोके घ्यायची ?
६) हवेला कोणाबरोबर बोलायला आवडायचे ?
७) जंगलात छोटेसे काय होते ?
८) चिमणीला कशावर बसायची मौज वाटायची ?
९) फांदयावर बसून कोण झोके घ्यायची ?
१०) 'झाड' या शब्दाचे समानार्थी शब्द लिही.
११) वरील उताऱ्यात कोणत्या रंगाचे नाव आले आहे ?
१२) वरील उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिही. 
१३) तुला माहीत असलेल्या झाडांची नावेलिही.
१४) तुझ्या परीसरातील झाडांची नावे लिही.
१५) झाडाचे मुख्य अवयव कोणकोणते असतात ?
१६) 'झोका' या शब्दाचे अनेवचनी रूप सांग.
१७) वरील उताऱ्यात आलेल्या एक प्राणी व एक पक्ष्याचे नाव सांग.
१८) 'झाडे नसती तर' या विषयावर पाच ओळी लिही. 
१९) झाडासंबंधी तुला माहीत असलेला सुविचार / घोषवाक्य लिही.
२०) एका झाडाचे चित्र काढून रंगव.