⚜️गवंडी⚜️
गवंडी आपल्याला बांधकाम करण्यासाठी उपयोगी पडतात. घरे, पूल, शाळा व अनेक प्रकारच्या इमारती आपल्याला हव्या असतात. गवंड्यांचे काम कष्टाचे असते. त्यांना उभे राहून काम करावे लागते. सतत ओल्या जागी काम करावे लागते. त्यांचे काम कौशल्याचेही असते. धोका पत्करून उंच ठिकाणी काम करावे लागते. गवंड्यांना सिमेंट टाकण्यासाठी थापी, भिंत उभी सरळ आहे की नाही हे तपासण्यासाठी ओळंबा व कोपरे बांधण्यासाठी गुण्या उपयोगी पडतो. दगड किंवा विटा फोडण्यासाठी हातोड्याचीही गरज भासते. असे हे गवंडी तुम्हां-आम्हांला निवारा तयार करून देतात.