⚜️गर्वाचे घर खाली⚜️

⚜️गर्वाचे घर खाली⚜️

   कोंबडयांवरून जुंपलेल्या भांडणामध्ये एक खूप जखमी होऊन पराभूत झाला होता. बिचा-याने लाजेने चूर होऊन एका अडगळीमध्ये तोंड लपविले.
       विजयी झालेला दुसरा कोंबडा एका उंच भिंतीवर दिमाखाने चढला व अगदी उच्च स्वरात त्याने आपण जिंकल्याच्या आनंदात त्याने एक ललकारी मारली.
   त्याला पाहाताच, एका गरूडाने त्याच्यावर झेप टाकली व त्याला उचलून तो आकाशात उंच उडाला.
   पराभूत झालेला कोंबडा तोंड लपवून बसलेला असल्यामुळेच बचावला नि अखेर कोणी प्रतिस्पर्धी न उरल्यामुळे निश्चिंतपणाने त्या कोंबडयांमध्ये खेळू बागडू लागला.
तात्पर्य:- गर्वाचे घर नेहमी खालीच असते. घमेंडीत वावरणा-यांचा सदैव नाश होतो.