⚜️पेरू⚜️
पेरू हे आपल्याकडे सर्वांनाच उपलब्ध होणारे फळ आहे. हिवाळ्यात पेरू सर्वत्र मिळतात. पेरूचे फळ साधारणपणे आंबा, डाळिंबाच्या फळाएवढेच असते. पेरूत खूप बिया आढळतात. पेरू हे फळ पोर्तुगीजांनी भारतात आणले, असे म्हटले जाते. पेरूच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पेरू सात्विक व बुद्धिवर्धक असतो. त्यामुळे सर्वांनी पेरू खायला हवेत. पेरू जंतुनाशक आहे. पेरूचा मुरंबाही करतात.