⚜️आदर⚜️
एका राज्यात विचित्र प्रथा होती. गावातील कोण्या व्यक्तीने वयाची साठी ओलांडली, की त्याला राज्याच्या बाहेर जंगलात राहायला पाठवलं जायचं. कारण समाजात फक्त स्वस्थ आणि तरुण लोकच जिवंत राहावेत.
त्या जंगलात ती म्हातारी व्यक्ती कसं आयुष्य जगेल, याची कोणाला चिंता नसायची. त्याच राज्यात एक व्यक्ती लवकरच साठ वर्षांचा होणार होता. त्याचा तरुण मुलगा आपल्या वडिलांवर खूप प्रेम करीत होता. आपल्या वडिलांना इतर म्हाताऱ्या व्यक्तींसारखं जंगलात पाठवण्याची इच्छा त्या मुलाला नव्हती. म्हणून त्याने आपल्या वडिलांना घराच्या तळघरात लपवून ठेवले व त्यांच्या प्रत्येक सोयी-सुविधेकडे लक्ष देत, त्यांची काळजी घेत होता. एकदा त्या मुलाने गावातील लोकांसोबत शर्यत लावली, की उद्या सकाळी सूर्याचे पहिले किरण कोण बघणार ? जेव्हा त्याने याबाबत आपल्या वडिलांना सांगितले, तेव्हा त्यांनी सल्ला दिला की, एक लक्षात ठेव, ज्या जागी तू सर्वांसोबत सूर्याचं पहिलं किरण बघायला जाणार, तेव्हा सर्वजण पूर्वेकडे बघतील, त्यावेळी तू मात्र त्याच्या विरुद्ध आली.
पश्चिमेकडे बघ. पश्चिमेकडे सर्वांत उंच पर्वतावर नजर ठेव, यामुळे शर्यत तूच जिंकणार. दुसऱ्या दिवशी त्याने वडिलांनी सांगितल्याप्रमाणेच केले. त्यामुळे सर्वांत आधी त्यानेच सूर्यकिरण बघितले. जेव्हा लोकांनी विचारले, की त्याला हा सल्ला कोणी दिला ? तेव्हा त्याने सर्व लोकांसमोर सांगितले की, त्याने त्याच्या वडिलांना तळघरात लपवून ठेवले आहे व ते नेहमी त्याचे मार्गदर्शन करतात.
सर्व लोकांच्या लक्षात आले, की वृद्ध व्यक्ती जास्त समजदार आणि अनुभव असतात. त्यांचा सन्मान करायला हवा. त्या दिवसानंतर त्या राज्यात म्हाताऱ्यांना राज्याबाहेर काढण्याची प्रथा बंद करण्यात आली.
तात्पर्य :- वृद्ध व्यक्ती जास्त समजदार आणि अनुभव असतात. त्यांचा सन्मान करायला हवा.