⚜️उतारा वाचन भाग ५४ ⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ५४ ⚜️

  सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदिर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईने तीन-चार उंदिर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदिर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरुन गेले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) उंदरांची टोळी केव्हा बाहेर पडली ?
२) उंदिर पिंपापाशी का धावत आले ?
३) कशाचा खमंग वास सुटला होता ?
४) भजी कोठे ठेवलेली उंदरांना दिसली ?
५) घाईघाईने किती उंदिर पुढे धावले ?
६) कशामूळे उंदिर पिंपाच्या पाण्यात पडले
७) उंदिर कसे मेले ?
८) सर्वत्र सामसूम झाल्यावर कोणाची टोळी बाहेर पडली ?
९) उताऱ्यात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला आहे ?
१०) उताऱ्यात कोणत्या खाण्याच्या पदार्थाचा उल्लेख आला आहे ?
११) 'डबकन' यासारखे तुला माहित असलेले शब्द लिही.
१२) शब्दाच्या शेवटी 'ळी' येणारे शब्द लिही. उदा. टोळी
१३) 'पिंपावर' या शब्दात कोणता खाण्याचा पदार्थ लपलेला आहे.?
१४) उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत?
१५) तुझ्या वहित उंदराचे चित्र काढ.