⚜️सातत्य महत्त्वाचे⚜️
कासव आणि ससा यांच्यात कोण जास्त जोरात पळून एखादे स्थान गाठू शकतो याबद्दल वाद निर्माण होतो. ससा आणि कासव, दोघेही " मी हे लक्ष्य लवकर साध्य करू शकतो" असा दावा करतात. शेवटी प्रत्यक्ष शर्यत घेऊन हा वाद मिटवावा असे ते ठरवतात. शर्यतीची जागाही ठरते आणि शर्यत सुरू होते.
ससा सुरुवातच खूप जोरात पळून करतो, तेव्हा काही अंतर कापल्यावर तो थोडा थकतो. तो बघतो तेव्हा कासव बरेच दूर राहिलेले असते. ससा विचार करतो की, आपण झाडाखाली थोडी विश्रांती घ्यावी आणि ताजेतवाने झाल्यावर शर्यत पूर्ण करावी. कासव इतके मागे पडले आहे की, ते आपली बरोबरी कधीच करू शकणार नाही.
ससा एका झाडाखाली थांबतो. अंग टाकल्यावर त्याला झोप लागते. मोठ्या कष्टाने चालत येणारे कासव सशाला मागे टाकीत आपली शर्यत पूर्ण करते आणि साहजिकच ठरवलेली स्पर्धा जिंकते.
ससा जागा होतो आणि आपण हरलो आहोत हे बघून दु:खीही होतो.
तात्पर्य :- शांतपणे आणि सातत्याने काम करणारे शर्यत जिंकतात.