⚜️उतारा वाचन भाग ४९⚜️
आपण रोज जे अन्न घेतो त्याला आहार असे म्हणतात. पण हा आहार सकस असणे आवश्यक आहे. सकस आहारात अनेक घटकांचा समावेश असतो आणि प्रत्येक घटक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. सकस आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक जीवनसत्त्वे होय. कारण रोगप्रतिकारक शक्ती जीवनसत्त्वामुळेच तयार होते. शरीराची झीज भरुन काढण्यासाठी 'ए' जीवनसत्व, पचन क्रीया योग्य होण्यासाठी 'बी' जीवनसत्व, रोगप्रतिबंधक शक्ती टिकून राहण्यासाठी 'सी' जीवनसत्व तर शरीराची योग्य वाढ होण्यासाठी 'डी' जीवनसत्व आवश्यक आहे. ही जीवनसत्त्वे ताजी फळे, भाजीपाला यातून मिळतात. आहार हा नेहमी रसात्मक असावा.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) आहार कशाला म्हणतात ?
२) सकस आहारात कशाचा समावेश होतो ?
३) सकस आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ?
४) रोगप्रतिकारक शक्ती कशामूळे तयार होते ?
५) 'ए' जीवनसत्त्वाचा उपयोग सांगा.
६) रोगप्रतिकार शक्ती कोणत्या जीवनसत्त्वामूळे टिकून राहते ?
७) 'सी' जीवनसत्त्वाचा उपयोग सांगा.
८) 'डी' जीवनसत्त्वाचा उपयोग सांगा.
९) जीवनसत्त्वे कशातून मिळतात ?
१०) जीवनसत्त्वे किती प्रकारची आहेत ?