⚜️यात्रा⚜️
माळेगाव येथे दरवर्षी खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेला दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते. या यात्रेत खंडोबाची पालखी परिसरातील गावातून आणली जाते. या यात्रेत घोड्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. हे गाव नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात लातूर-नांदेड रोडवर आहे.