⚜️उतारा वाचन भाग १४⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग १४⚜️


  पृथ्वीच्या पर्यावरणाच्या बाहेर सर्वत्र ओझोन वायू आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदुषणामूळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. हा वायू ओझोनवर हल्ला करत आहे आणि या हल्ल्यात ओझोनचा पराभव झाला तर अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर येतील व येथील सजीव सृष्टी नष्ट होईल अशी भीती वाटते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) पृथ्वीच्या पर्यावरणाच्या बाहेर कोणता वायू आहे ?
२) पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे ?
३) ओझोन वायू सजीवसृष्टीसाठी का आवश्यक आहे ? 
४) पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढत आहे ?
५) ओझोन वायूवर कोणता वायू हल्ला करत आहे ?
६) ओझोन वायू वातावरणात कमी झाला तर कोणते किरण पृथ्वीवर येतील ?
७) सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर आली तर सजीवसृष्टीवर काय परीणाम होईल ?
८) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आले होते ?
९) वरील उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा.
(१०) 'ओझोन वायूविषयी अधिक माहिती मिळवा.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421