⚜️उतारा वाचन भाग ३७⚜️
एक होते चिमणराव. एका चिमणीशी त्यांचे लग्न ठरले. कोंबड्यावर स्वार होऊन लग्न करण्यास चिमणराव निघाले. रंगीबेरंगी पक्षी त्यांच्या वरातीत सामील झाले. पोपट वरातीत ढोल वाजवू लागला. मैना आणि कबुतर नाचू लागले. चिमणरावांच्या सासूने वरातीचे स्वागत केले. तितर भटजीने चिमणा चिमणीचे लग्न लावले. सर्वांच्या आवडीचे जेवण वाढण्यात आले. सर्वांनी खुश होऊन निरोप घेतला.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) कोंबड्यावर स्वार होऊन कोण निघाले ?
२) चिमणराव कशावर स्वार झाले ?
३) कोंबड्यावर स्वार होऊन चिमणराव का निघाले ?
४) चिमणरावांच्या वरातीत कोण-कोण सामील झाले ?
५) वरातीत ढोल कोण वाजवू लागला ? वरातीत कोण नाचू लागले ?
६) पोपट वरातीत कोणते वाद्य वाजवू लागला ?
७) वरातीचे स्वागत कोणी केले ?
८) तितर भटजीने कोणाचे लग्न लावले ?
९) चिमणा चिमणीचे लग्न कोणी लावले ?
१०) सर्व पक्षी खूश का झाले ?
११) 'खूश होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१२) वरील उताऱ्यात कोणते पक्षी आले आहेत ?
१३) तुम्ही एखाद्या लग्नप्रसंगी गेला असेल तर तुम्ही अनुभवलेला आनंदी प्रसंग सांगा.
१४) वरील उताऱ्यात किती पक्षी आले आहेत ?
१५) वरील उताऱ्यात आलेले जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.