⚜️उतारा वाचन भाग ८⚜️
छंद म्हणजे नाद. फावल्यावेळी आपण एखादी गोष्ट जोपासतो. एकदा एखाद्या गोष्टीचा छंद लागला की, ती गोष्ट पुनः पुन्हा करावीशी वाटते. आणि तो छंद मग आपला छंद होऊन बसतो. प्रत्येकाला कोणताना कोणता छंद असतो. कोणी उत्तम चित्रे काढण्याचा छंद जोपासतो, तर कोणी वाचनाचा, कोणी क्रीकेट खेळण्याचा छंद जोपासतो, तर कोणी कविता लिहिण्याचा छंद जोपासतो. मला मात्र छंद जडला वर्तमानपत्रातील कात्रणे काढून संग्रहित करण्याचा. अंतराळ, विश्व, खगोल याबद्दल जे-जे काही छापून येईल ते ते संग्रही ठेवण्याचा मला जणू नादच लागला.
⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) छंद म्हणजे काय?
२) आपला आवडता छंद हा छंद कधी होऊन बसतो?
३) प्रत्येकाला साधारण कोणते छंद असतात?
४) लेखकाला कोणता छंद जडला होता ?
५) लेखकाला कशाचा नाद लागला होता ?
६) वरील उताऱ्यात किती जोडाक्षरे आली आहेत ?
७) 'छंद' या शब्दाला पर्यायी शब्द लिहा.
८) तुम्हांला काय काय करायला आवडते ते लिहा.
९) 'माझा आवडता छंद' या विषयावर दहा ओळी निबंध लिहा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421