⚜️फुलपाखरे⚜️

 ⚜️फुलपाखरे⚜️

 फुलपाखरे आपल्याला सगळीकडे दिसतात. जिथे झाडे असतील तिथे फुलपाखरे दिसतात. फुलपाखरे अगदी लहानही असतात आणि थोडी मोठीही असतात. फुलपाखरे त्यांच्या पंखांमुळे लगेच ओळखून येतात. त्यांच्या पंखांवर रंगीबेरंगी व आकर्षक नक्षी असते. फुलातील रस हेच त्यांचे अन्न असते. अन्न मिळवण्यासाठी फुलपाखरे फुलांफुलांवरून उडत असतात.