⚜️मदत ⚜️

 ⚜️मदत ⚜️

   एक गाव होते. त्या गावाचे नाव  ढोलकपूर होते. त्या गावाला लागूनच एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात एक मोर राहत होता. दोन मुले जंगलात फिरायला गेली. त्यांना एक मोर व त्याचे पिल्लू दिसले. तेवढ्यात अचानक धो धो पाऊस आला. ते दोघे झाडाखाली लपले. ते दोघे मोराकडे बघतच होते. मोर पिसारा फुलवून नाचायला लागला. हे दोघे बघतच होते. काही वेळाने पाऊस थांबला. नी मुले मोराजवळ जाऊन त्याला पकडायला लागली. मोर त्याच्यावर झेप घेऊन उडून गेला. उडता उडता तो थकला. मोर खाली बसला तो पुन्हा त्याच जागी गेला. त्याला त्याची पिल्ले दिसली. तो पिल्ले घेऊन आपल्या घरी गेला. रात्र झाली तशी मुलेसुद्धा घरी गेली. त्या मुलांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा जंगलात जाळे लावले. मोर पिल्लांना घेऊन तलावावर गेला. पाणी पिताना मोराचा पाय जाळ्यात अडकला. ती दोन मुले मोराजवळ आली. एक मुलगा म्हणाला, "अरे चल आपल्याला मोर मिळाला,' पण दुसरा मुलगा म्हणाला, "नाही, याला आपण मदत केली पाहिजे,” त्या दोघांनी जाळ्यातून त्याचा पाय सोडवला आणि त्याला सोडून दिले.
तात्पर्य:- दुसऱ्याची मदत केली पाहिजे.