⚜️कोंबडी⚜️
कोंबडी हा पाळीव पक्षी आहे. खेडेगावातील लोक कोंबड्या पाळतात. कोंबड्यांच्या निवाऱ्याला 'खुराडे' असे म्हणतात. कोंबड्या आसपासच्या परिसरात फिरतात. जमिनीवरील किडे, अन्नाचे कण चोचीने पकडतात आणि गिळतात. कोंबड्यांना खाण्यासाठी धान्यही टाकतात. कोंबड्यांची फार काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे गाय, म्हैस या प्राण्यांपेक्षा कोंबड्या पाळणे सोपे असते., कोंबड्या अंडी आणि मांसासाठी उपयोगी पडतात. कोंबड्यांना आपल्या बोजड शरीरामुळे दूरवर उडता येत नाही.