⚜️मत्सर⚜️

 ⚜️मत्सर⚜️

        एकदा एक मत्सरी मनुष्य देवाची प्रार्थना करण्याकरिता एका देवळात गेला. त्याचवेळी तेथे एक लोभी मनुष्यही आला. दोघांनीही देवाची प्रार्थना केल्यावर देव प्रसन्न झाला. तो त्यांना म्हणाला, “तुमच्यापैकी पहिल्याने जो जे मागेल त्याच्या दुप्पट मी दुसऱ्याला देई. "
    ते ऐकून तो लोभी मनुष्य गप्प बसला. त्याने मनातून देवाजवळ पुष्कळ गोष्टी मागायच्या ठरविल्या होत्या पण आपण आधी काही मागितले तर दुसऱ्याला दुप्पट मिळेल आणि आपण गप्प बसलो तरच आपला जास्त फायदा होईल, असा विचार करून तो काहीच बोलला नाही.
   मत्सरी मनुष्यालाही काय मागावे याची पंचाईत पडली पण शेवटी त्याच्या स्वभावाला अनुसरून तो म्हणाला, "देवा, माझा एक डोळा फोड,” अर्थातच त्या लोभी माणसाचे दोन्ही डोळे फुटले.
तात्पर्य :- आपलं त्यात वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं नुकसान करण्यातच मत्सरी मानसांना आनंद वाटतो.