⚜️उपदेश⚜️
एका शेतात एक शेतकरी अंबाडीचे बी पेरत होता. कुंपणावर बसलेल्या पक्ष्यांतला एक शहाणा पक्षी म्हणाला, 'हा अंबाडीची पेरणी करत आहे, याच्यापासून सावध राहा. आत्ताच सर्वांनी मिळून ते सर्व बी गिळून टाका, नाहीतर मग पश्चात्ताप करण्याची वेळ येईल पण त्याच्या या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. काही दिवसांनी अंबाडी शेतात पिकली. त्याची कापणी होऊन अंबाडीचे दोर वळले गेले. त्यापासून जाळी तयार झाली आणि पक्ष्यांना पकडण्याकरिता त्याचा उपयोग होऊ लागला अखेर शेवटी त्या पक्ष्यांना त्या शहाण्या पक्ष्याच्या बहुमोल उपदेशाची किंमत समजली. पण त्या वेळी खूप उशीर झालेला होता.
तात्पर्य:- एखाद्याने दिलेला उपदेश जर योग्य असेल तर तो वेळीच अमलात आणला पाहिजे. अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येते. म्हणून दुसऱ्या सुज्ञ व्यक्तींनी दिलेल्या योग्य सूचना सदैव अमलात आणाव्यात, त्यातच आपला उत्कर्ष होतो.