⚜️माझा आवडता पाळीव प्राणी - गाय⚜️
गाय आपण सर्वांनीच पाहिली आहे. गाईचे अनेक रंग अनेक जाती असतात. गवत, कडबा, भुसा व धान्य वगैरे गाईचे अन्न आहे. गाय देते.
गाईच्या दूधापासून दही, ताक, लोणी, तूप बनवितात. गाईचे दूध लहान बाळाच्या आईच्या दूधासारखे असते. गाय फार उपयोगी व गरिब प्राणी आहे. गाईपासून शेतीला बैल मिळतात. हिंदू गाईला दैवत मानतात आणि तीची पूजा करतात. देवगी, गीर, सिंधी, बेंगलोर व गाईच्या चांगल्या जाती आहेत.
संकरित गाई भरपूर दूध देतात. प्रत्येक कुटूंबाने एक संभाळावी. गाईचा सांभाळ चांगला करावा व भरपूर दूध मिळवावे. दूध हे पूर्ण अन्न आहे. तसेच दूधापासून आर्थिक उत्पन्नही चांगले होते. प्रत्येक कुटूंबाने एक तरी गाय पाळावी.