⚜️स्वातंत्र्याचे निशाण⚜️

 ⚜️स्वातंत्र्याचे निशाण⚜️

स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार
महात्मा गांधी, सुभाव नेहरू, बोला जयजयकार ॥धृ॥

शिवाजी राजे होऊन गेले, गाजवली तलवार
त्यांच्या वंशी, तुम्ही जन्मले पडले थंडगार ॥१॥

झाशीची राणी लक्ष्मी बाई, ती एक होती नार
ढाल छातीशी, पुत्र पाठीशी, कमरेला तलवार ॥२॥ 

दारू गांजा पिऊन तुम्ही बनले दारूबाज
इंग्रजांच्या लाथा खाल्या नाही तुम्हाला लाज ॥३॥