⚜️खरे अपयश⚜️
एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत
घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?"
यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या
यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे." रीपोर्टर ने ते
उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला
सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?"
यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने
उत्तर दिले, "अनुभव (Experience).
मला
आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !"
हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, "
तुम्ही
हे सर्व अनुभव कसे मिळवले ?"
यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा
पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या
आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !"
तात्पर्य:- आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर
ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं
अपयश असतं.