⚜️खरा तो एकचि धर्म⚜️
खरा तो एकचि धर्म ।
जगाला प्रेम अर्पावे ॥धृ॥
जगी जे हिन अतिपतीत।
जगी जे दीन पददलीत||
तया जाऊन उठवावे ||1||
सदा जे आर्त अति विकल।
जयांना गांजती सकल ||
तया जाऊन हसवावे ||2||
कुणा ना व्यर्थ शिणवावे।
कुणा ना व्यर्थ हिणवावे ||
समस्ता बंधु मानावे ||3||
प्रभुची लेकरे सारी।
तयाला सर्व ही प्यारी ॥
कुणा ना तुच्छ लेखावे ||4||
असे हे सार धर्माचे।
असे हे सार सत्याचे ||
परार्थी प्राण ही दयावे||5||
प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.