⚜️असो तुला देवा माझा⚜️

 ⚜️असो तुला देवा माझा⚜️

असो तुला देवा माझा सदा नमस्कार 
तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृतिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार॥1॥

तुझ्या कृपेने रे होईल, उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होईल, पंगु सिंधु पार ॥2॥ 

तुझ्या सिंघुमधला बिंदु जरि मिळेल
तरी शतजन्माची मम तृषा शमेल 
तुझा म्हणूनी आलो देवा, बघत बघत दार ॥3॥

प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.