⚜️सत्यम शिवम सुंदरा⚜️

 ⚜️सत्यम शिवम सुंदरा⚜️

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा । 
सत्यम शिवम सुंदरा ॥धृ॥ 

शब्द रूप शक्ती दे। भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा ।।1।।ज्ञानमंदिरा

 विद्यावन दे आम्हास | एक छंद एक ध्यास
नाव लेई पैलतीरी दयासागरा ।।2।। ज्ञानमंदिरा 

होऊ आम्ही नितीमंत।कला गुणी बुध्दीमंत 
किर्तीचा कळस जाई उंच अंबरा ।।3।। ज्ञानमंदिरा

प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.