⚜️अशी नको रुसु⚜️
अशी नको रुसु,
कोपक्यात बसु,
राजाची राणी होशील गं...
पोरी दुमकत नांदायला जाशील गं ।।धृ।।
काल आली होती मंडळी किती,
ठरवून गेले लग्नाची तिथी
भरजरी शालु, नेसशील मालु,
हकदीने पिवळी होशील गं ।।१।।
पाच सुवासिनी, बाल मैत्रिणी,
भरतील ओटी खणा नारळांनी
निरोप आला बाई, दारी येता आई,
पदराने डोळे पुरशील ।।२।।
सौभाग्याचा ठसा उमटेल कसा,
पतिवीन संसार चालेल कसा
पति हाच देव, तुझ्या जन्माची ठेव,
सुखाने संसार करशील गं.।।३।।