⚜️तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी⚜️

  ⚜️तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी⚜️

तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे, ज्योत उजळु दे हीच मनोकामना

ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी
सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी
सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा

वत्‍सलतेचा गहिवर जेथे, स्पर्श प्रभूचा तेथे
‍होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते
तोच फुलांना जागविणारा, विश्वाची प्रेरणा

वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते
ठायीठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते
जन्‍म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना

प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.