⚜️शारदे हवे तुझे वरदान⚜️

⚜️शारदे हवे तुझे वरदान⚜️


शारदे हवे तुझे वरदान ll धृ ll

मानवतेची गावी गाणी,
अशी आम्हा दे जिवंत वाणी l
अन्यायाचे दर्शन होता,उसळो त्वेष उधान ll१ll शारदे हवे.......

स्वतंत्र भारतभूचे वैभव ,सामर्थ्याने नटलेले नव,
उच्छवासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ll२ll शारदे हवे.......

मराठीयेची नगरी आम्ही शिल्पकार की रचनाप्रेमी
जीवन मंदीर उभवू सुंदर हा अमुचा
अभिमान ll३ll शारदे हवे.......

उकलायाला जीवनशास्त्रे,पहावया नव विक्रमक्षेत्रे
दिव्यदृष्टी दे करावयाला उन्नत जीवन मान ll४l शारदे हवे.......

दिवंगतांच्या अतृप्त आशा,पूर्ण कराया अशी मनीषा,
भीष्मकामना निववाया दे,अर्जुन शर संधान ll५ll शारदे हवे.......

नव्या युगाची नवीन सृष्टी नव्या मानवा दे नव दृष्टी
हवा शारदे नवा वीरंची नवचातुर्य निधानll६ll शारदे हवे.......

प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.