⚜️उतारा वाचन भाग ७४⚜️
कपिला गाय आहे. कपिला गाय गोठ्यात आहे. कपिला गाय चरा खाते. कपिला गाय दूध देते. मुले आवडीने दूध पितात.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) गायीचे नाव काय आहे ?
२) कपिला गाय काय देते ?
३) कपिला गाय कोठे आहे ?
४) कपिला गाय काय खाते ?
५) कोण आवडीने दूध पिते ?
६) कपिला कोण आहे ?
७) गोठ्यात कोण आहे ?
८) चारा कोण खाते ?
९) दूध कोण देते ?
१०)“कपिला गाय दूध देते.” या वाक्यातील क्रियापद कोणते ?
११) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
१२) घोड्याचा- तबेला तसे गाई-गुरांचा ?
१३)'कपिला गाय आहे' या वाक्यातील नाम कोणते ?
१४)'मुले आवडीने दूध पितात' या वाक्यात 'मुले' या शब्दाऐवजी सर्वनाम वापरा.
१५) दूध देणाऱ्या व दूध न देणाऱ्या प्राण्यांची यादी करा.