⚜️आधुनिक म्हणी⚜️
- कायदा सरकारचा, कायदा वकिलाचा
- आधीच महागाई, त्यात आला जावाई
- दोन मिनिट प्राध्यापकाचे, दोन तास परीक्षेचे
- सासुबाई घरात, सुनवाई महिलामंडळात
- फॅशनमध्ये हिरो, अभ्यासात झिरो
- राहायला नाही घर म्हणे लग्न कर
- सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये
- खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन
- मुलं करतात चॅनेल सर्फ, आईबाप करतात होमवर्क
- चुकली मुलं सायबरकॅफेतौऔ
- चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये
- ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार
- नाजुक मानेला मोबाईलचा आधार
- मनोरंजन नको रिंगटोन आवर
- स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा
- जागा लहान फर्निचर महान
- उचलला मोबाईल लावला कानाला
- रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार
- स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार
- मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका
- न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला
- पुढाऱ्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये
- नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही
- नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही
- घरावर नाही कौल पण अँटिनाचा डौल
- घाईत घाई त्यात चष्मा नाही
- रिकामा माळी ढेकळ फोडी
- ज्याला नाही रान, त्याला पावसाचा लई तान
- ओठापेक्षा लिपस्टीक जड
- नाकापेक्षा चष्मा जड
- अपुऱ्या कपडयाला फॅशनचा आधार
- बायकोची धाव माहेरापर्यंत
- गोष्ट एक चित्रपट अनेक
- काम कमी फाईली फार
- घे लाच पण आवर जाच
- मंत्र्याच पोर गावाला घोर
- मरावे परी मूर्तिरुपे उरावे
- नटीच्या लग्नाला सतरा नवरे
- मिळवत्या मुलीला मागणी फार
- रिकामी मुलगी शृंगार करी
- प्रेमात पडला हुंडयास मुकला
- दुरुन पाहुणे साजरे
- ऑफीसात प्यून शहाणा
- सत्ता नको पण खैरनार आवर
- एक ना धड भाराभर पक्ष
- हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे
- थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे
- तोंडाला पदर गावाला गजर
- कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं
- रात्र थोडी डास फार
- शिर सलामत तो रोज हजामत
- नेता छोठा कटआऊट मोठा
- चिल्लरपुरता सत्यनारायण
- डीग्री लहान वशिला महान
- दैव देते आयकर नेत
- काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं
- साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा
- ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी
- एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण
- लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी
- चोऱ्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला!
- आपले पक्षांतर, दुसऱ्याचा फुटीरपणा
- प्रयत्ने लाईनीत उभे राहता CNG मिळे
- अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा
- एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो
- सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना
- वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला
- वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले
- साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता
- मरावे परी रेशनकार्ड रूपी उरावे
- वशिल्याच्या नोकरीला इंटरव्यू कशाला?
- घरोघरी मॉडर्न पोरी
- घरात नाही दाणा म्हणे ट्रांझिस्टर आणा
- जया अंगी खोटे पण, तथा मिळे मोठेपण
- अपुऱ्या कपड्याला फँशनचा आधार
- देव तारी त्याला अतिरेकी मारी
- इकडे महागाई तिकडे भ्रष्टाचार
- दारूची तहान हातभट्टीवर
- निवडणूक सरो मतदार मरो
- तुका म्हणे भोग सरे, पास होती रद्दाड पोरे
- दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
- दहा गेले पाच उरले.
- दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
- दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.
- दांत कोरून पोट भरतो.
- दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.
- दानवाच्या घरी रावण देव.
- दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
- दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा.
- दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
- दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
- दिवस बुडाला, मजूर उडाला.
- दिवस मेला इथं तिथं, अन रात्र झाली निजु कुठं.
- दिवसा चुल, रात्री मूल.
- दिवाळी दसरा, हात पाय पसरा.
- दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
- दुःख रेड्याला न डाग पखालीला.
- दुधात साखर आणि आंघोळीत लघवी.
- दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त.
- दुभत्या गाईच्या लाथा गोड.
- दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
- दृष्टी सर्वांवर, प्रभुत्व एकावर.
- दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे!
- देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
- देण कुसळाच, करणं मुसळाच.
- देणे ना घेणे, दोन्ही सांजचे येणे.
- देणे ना घेणे, रिकामे गाणे.
- देव लागला द्यायला, पदर नाही घ्यायला.
- देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
- देवाची करणी आणि नारळात पाणी.
- देह देवळात, चित्त पायतणात.
- दोघींचा दादला उपाशी.
- दोन डोळे शेजारी,भेट नाही संसारी.
- रंग झाला फिका आणी कुणी दिना मुका
- पैसा ना आडका अन बाजार भडका
- एका माळचं मणी आणि ववायला नाही कुणी
- झोपुन हागणार उठून बघणार
- खायाला आधी झोपायला मधी आणि कामाला कधी मधी
- नाजुक नार खायी चाबकाचा मार
- नशीब आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला
- दात नाय मुखात आणि विडी घाली खिशात
- माझा ओटा बरा आणि माझा गोठा बरा
- बुडाला जळतय आणि डोंगर विझवाय पळतय
- दमडीचा सौदा आन येरझर्या चौदा
- एक एक बात अन नऊ नऊ हात
- देनं न घेणं अन फुकटंच येणं
- कुञ्याचं जिणं आणि फजितीला काय उणं
- एका देवळातले तेल चोरून दुसर्या देवळात दिवा लावणे
- पोकळ माया आणि उपाशी निज ग बया
- आपली गाय आणि लोकाचा वेल खाय
- नाका पतुर पदर आणि येशी पतर नजर
- देनं कुसळाच अन करणं मुसळाच
- पाद्रयाला पावट्याच निमीत
- न नांदनारी ला बारा बुद्या कपाळ फोडुन बांधल्या चिंध्या
- पळणाराची एक वाट आणि शोधणाराच्या बारा वाटा
- जित्यापणी नाही गोडवा आणि मेल्यावर आडवा
- चव ना धव अन पोटभर जेव
- त्याल जळतय राजाचं आन् बुड जळतय मशालीचं
- कामा ना धामाचा आणि भाकरी खाय नेमाचा
- चेहरा भोळा भानगडी सोळा
- अंगात नाय बळ अन चिमटा काढुन पळ
- कधी भी उठायच आणि खाजवत सुटायच
- आलं म्हणुन हळकुंड खिसणारे
- येळ ना वकत अन गाढव चालयय भुकत
- येवु नक तर कोणच्या गाडीत बसु
- शुभ बोल नार्या तर मांडवाला आग लागली
- वाटेला फाटा अन गावाला फुकटचा हेलपाटा
- शेंबुड आपल्या नाकाला अन् नावं ठेवतय लोकाला
- कोरडी मया आणि उपाशी नीज ग बया
- कुणाला कशाच आन बोडकीला केसाच
- तोंडात ग्वाड आन मणात फाॅड
- माकाड गेले लुटी आणि आणल्या दोन मुठी
- खिशात नाई पावला अन मका द्यायला धावला
- शेंबुड जायना नाकाचा आन शब्द माञ टोकाचा
- जिकडं गुलाल तिकडं उदोउदो
- नुसत्याच मोठ्या मोठ्या बाता आणि येळला घाली लाथा
- चव ना धव आणि आघोरा मासा पोटभर जेव
- येळ ना वखत अन् गाढव चाललय भुकत
- कुञ्यांचा शिमगा आणि गावभर दंगा
- जिथं वग नाय तिथं डोळं वासुन बघ
- रांधता येईना ओली लाकडं
- आपण दोघं भाऊ आन गठुड्याला नको हात लावु
- बांधला मणी अन झालां धनी
- आपलं नाही धड आन शेजार्याची कड
- हाती नाय आडका आन बाजारात भडका
- ज्याची बायको मुकी तोच सर्वात सुखी
- उडत्या पाखराची पिसे मोजने
- चोराला डसला ईचु अन तो करेणा हु का चु
- काम करायचं कुसळा येवढं नावाल, अन येडं बनवतय गावाला
- नाक कांपल तरी भोकयं
- देणं न घेणं अन मुसळ घेऊन येणं
- कुणी नाही कुणाचे वरण भात लोणचे
- कुणाला कशाचं तर बोडकीला केसाचं
- चावडीवर हाणायचं आणि कुणाला सांगु नको म्हणायच
- कशाचं काय अन फाटक्यात पाय
- लेक आली वाळुन अन अंघुळ घाली चोळुन
- येडं पेरलं अन् ऊगवलं खुळ
- नवरा जातोय नवरीसाठी आणि वर्हाड जातय जेवणासाठी
- खाण तसी खापरं आन बाप तशी लेकरं
- नागड्यानं ऊघड्याला कपडे काढुन देणे
- लाज नाही लाज्याला त्याल लाव फाजाला
- येडं उठलं अन चिपट्यात मुतलं
- काम ना धंदा हार हार गोविंदा
- सरलं सालं ओसरलं गालं
- कधीही उठायचं आणि चोथ्यात मुतायंच
- पोरी तितक्या फॅशन
- मिठाचे खाणार त्याला ब्लडप्रेशर होणार
- रिकाम्या पर्सला हेलकावे फार
- महिला मुठभर गप्पा हातभर
- वायरीला वायर भिडे जिथे, शॉर्ट सर्किट होईल तिथे
- खायला रेशनचा कोंडा, आणि फिरायला हिरो होंडा
- अभ्यास घटकाभर, गप्पा तासभर
- जागा चार, अर्ज हजार
- दिसते चांगली साडीत पण चालते रस्ता झाडीत
- भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलापाशी
- भगवान तेरी माया, कहीं धुप कोही छाया
- कोट पप्पाचा, हात मम्मीचा
- मायच दिसतं, बापाचं लपतं
- पाहुणा गेला अन चहा केला
- म्हशी मेल्या, चारा संपला अन हाती घोटाळा आला
- मंत्र्याचे बिऱ्हाड दौन्यावर
- आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज
- गाढवापुढे वाचली गीता, बाचणारच गाढव होता
- घरोघरी फॅशनेबल पोरी
- मरावे परी कैसेटरूपे उरावे (व्हिडीओ कॅसेट)
- रिकामा मंत्री फितींना कात्र्या लावी
- कशात काय आणि खडयात पाय
- इन्कम थोडे, पोरे फार
- उचलली लिपस्टिक लावली ओठांना
- लड बापु लढ आणि आडवा तिडवा पड
- पँटला नाही नाडी आणि पोरगं मागतय गाडी.
- थोडक्यात नटावे अन् प्रेमाने भेटावे.
- अंधारात केलं अन् उजेडात आलं.
- लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय खात नाही….
- अंगात नाही बळ अन् चिमटा घेउन पळ
- अतीशहाणा त्याचा facebook रिकामा
- post चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
- आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
- दिसतं तस profile pic नसतं म्हणूनच public फसतं
- मरावे परी facebook रूपी उरावे
- तूप खाऊन रूप येत नाही आणि शेंबूड पुसून सर्दी जात नाही
- टक्कल पडले म्हणजे अक्कल येत नाही
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ
- अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल
- अप्पा मारी गप्पा
- आंधळीपेक्षा तिरळी बरी
- आले मी नांदायला, मडके नाही रांधायला
- ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक
- कशात ना मशात, माकड तमाशात
- उचलला post लावला wall ला
- जात नसेल सर्दी तर घेऊन बघा आर्धी
- मी नाय त्यातली कडी लाव आतली
- नाय नाय म्हणती लई जीव लावती
- अक्कल नाही काडीची अन गाठ सुटाना नाडीची
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421