⚜️मानव धर्म काय सांगतो⚜️
१) दुसऱ्याला त्रास होईल, असे वागू नका.
२) दुसऱ्याचे पैसे बुडवू नका.
३) दुसऱ्याचे वाईट चिंतू नका व जळू नका.
४) दुसऱ्याच्या व्यवहारात अडथळा आणू नका.
५) दुसऱ्याच्या अन्नात माती कालवू नका.
६) दुसऱ्याला गोड बोलून फसवू करु नका.
७) दुसऱ्याची वस्तू फुकट लाज सोडून मागू नका.
८) दुसऱ्याची तोंड स्तुती करुन फसवू नका.
९) दुसऱ्याच्या खोट्या कामात मदत करु नका.
१०) दुसऱ्याला दिलेल्या शब्दास बदलू नका.
११) दुसऱ्याने केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करु नका.
१२) दुसऱ्याचे नेहमी फुकट खाण्याची सवय मोडून टाका.
१३) दुसऱ्याचा, आपल्या फायद्यासाठी तोटा करु नका.
१४) दुसऱ्याची चमचेगिरी करु नका, व इकडचे तिकडे करु नका.
१५) दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय स्वत: घेवू नका.
१६) दुसऱ्याने उधार माल दिला, त्याचे पैसे बुडविण्याचे निच कृत्य करु नका, व त्याचा धंदा बसवू नका.
१७) दुसऱ्याने उधार माल दिला नाही नंतर राग मानू नका.
१८) दुसऱ्याला कमी लेखून स्वत:ला शहाणे समजू नका.
१९) दुसऱ्याच्या घरात लावालावी करुन घर फोडू नका.
२०) दुसऱ्याची कमजोरी पाहून आपला स्वार्थ साधू नका.
२१) दुसऱ्याचा उपयोग कामापुरता करुन घेऊ नका.
२२) दुसऱ्याचे न ऐकता आपलेच म्हणणे खरे करु नका.
२३) दुसऱ्याकडून खोटा वायदा करून पैसे घेऊ नका.
२४) दुसऱ्याला काहीच कळत नाही असे समजू नका.