⚜️उतारा वाचन भाग ७५⚜️

⚜️उतारा वाचन भाग ७५⚜️

       आकलनासह ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन. वाचनाचे प्रकार चार प्रकार आहेत.प्रगट वाचन, सस्वर वाचन, सुस्वर वाचन व मूकवाचन. वाचनामुळे आपली स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय आपण अनेक नवीन शब्द देखील शिकतो जे आपले शब्दसंग्रह आणि आपले संवाद कौशल्य सुधारतात. जेव्हा आपण काहीही वाचतो तेव्हा आपण त्यात रमून जातो, आपण आपला भूतकाळ विसरतो आणि वर्तमानात जगतो. पुस्तके वाचून आपला ताण कमी होण्यास मदत होते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) वाचन म्हणजे काय ?
२) वाचनाचे प्रकार किती व कोणते ?
३) वाचनामूळे आपणास काय सुधारण्यास मदत होते ? 
४) संवाद कौशल्य कसे सुधारते ?
५) आपण वर्तमानकाळात कधी व कशामूळे जगतो? 
६) पुस्तके वाचल्याने काय फायदे होतात ?
७) आपला ताण कमी करण्यास कशामूळे मदत होते ?
८) आकलनासह केलेले ध्वनीचे उच्चारण म्हणजे काय ?
९) वाचनावर आधारीत तुम्हांला माहित असणारे सुविचार लिहा.
१०) 'वाचन प्रेरणा दिन' कधी असतो ?
 ११) तुम्हांला माहित असलेल्या लेखक व लेखिकांची नावे लिहा.
१२) तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या विविध पुस्तकांची नावे लिहा.
१३) महाराष्ट्रात 'पुस्तकांचे गाव' कोठे आहे ?
१४) वाचनावर आधारीत दोन घोषवाक्य लिहा.
१५) 'वाचन हि एक चांगली सवय आहे.' यावर तुमचे मत लिहा.