⚜️वंदन शारदेला⚜️

⚜️वंदन शारदेला⚜️

देवी 'शारदा' तुझे गोड नाम
तुजला मी करितो प्रणाम।।१।।

विद्या अभ्यास एकच ध्यान
सदा करितो तुझे चिंतन ॥२॥

पाहून तुझे सुंदर रूप
कविता रचावया येतो हुरुप ॥३॥

सदैव तू लेखणीत माझ्या
नमवितो मस्तक चरणी तुझ्या ।।४।।

गाउनी तुझे गान, सांगेन जगाला
विसरणार नाही देवी शारदेला ।।५।।