⚜️दिवाळी म्हणजे काय?⚜️
⚜️सिग्नलला सोनचाफ्याची फुले विकणाऱ्या त्या मुलीला पैसे देऊन तोच सोनचाफा तिलाच भेट दिल्यावर तिच्या मळलेल्या डोळ्यात उठलेली आनंदाची चमक म्हणजे दिवाळी...
⚜️केरसुणीचा फडा घेताना त्या आज्जीशी किंमतीची घासाघीस न करता दोन केरसुण्या घ्यायची आणि वर दहा वीस रुपये जास्त दिल्यावर, त्या आज्जीच्या चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्यांमधून झिरपणारे मंद हसू म्हणजे दिवाळी...
⚜️दुकानात गेल्यावर जे आवडते ते घेण्यासाठी आपल्याजवळ पैसे आहेत हे ज्या दिवशी पहिल्यांदा जाणीव होते तो क्षण म्हणजे दिवाळी...
⚜️दमलेल्या तिला, "दमलीस ना ? बस जरा वेळ. मी तुला मस्तपैकी चहा देतो." ही दिवाळी...
⚜️सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घामाघूम होऊन आवराआवरी केल्यावर लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळ्या डब्यातून भरताना तिच्या मनांत ओतप्रोत झिरपत जाणारा तो खमंग आपलेपणा म्हणजे दिवाळी...
⚜️ऑफीसाला निघालेलो असताना, तिने समोर यावं आणि हातांमधे चार पाच मोगऱ्याची फुलं ठेवावीत. हा मोगऱ्याचा गंध म्हणजे दिवाळी...
⚜️आपला मुलगा मोठा, समजूतदार झाल्याचा क्षण म्हणजे दिवाळी....
⚜️"बाबा, यंदा तुम्हांला आणि आईला मी नविन कपडे घेणार आहे." हे ऐकायला येण्याचा क्षण म्हणजे दिवाळी...
⚜️आपल्याला ऑफीसचा बोनस कधी मिळतोय याची वाट न बघता पूर्ण पगार आणि बोनस दिल्यावर फरशी पुसणाऱ्या मावशींच्या डोळ्यातला आनंद म्हणजे दिवाळी...
⚜️परस्परांतील हेवेदाव्यांची, झाले गेले मतभेदांची जळमटं दूर करुन, ते सगळं विसरुन एकत्र येणं म्हणजे दिवाळी...
अशी दिवाळी आपणा सर्वांच्याच आयुष्यात आनंदाचे, सुखा - समाधानाचे दीप पाजळत येवो.
⚜️शुभ दीपावली⚜️
🏮🪄🪔💥🌞🌻
=====================================================================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com
=====================================================================