⚜️दोन सोबती⚜️

 ⚜️दोन सोबती⚜️

दोन सोबती असती पहा, असती पहा
 त्यांचा ठरला विचार हा

आपण जाऊ रानात, रानात
बोरे खाऊ मजेत

तिकडुन आले अस्वल,अस्वल
दोघे झाले लाले लाल

एक चढला झाडावरी, झाडावरी
दुसरा निजला जमिनीवरी

अस्वल आले, 
हुंगून गेले

झाडावरचा खाली आला, खाली आला
निजलेल्या विचारू लागला

काय बोलले अस्वल रे अस्वल रे 
अशाची संगत नकोच रे