⚜️तू बुद्धि दे तू तेज दे⚜️

 ⚜️तू बुद्धि दे तू तेज दे⚜️ 

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
 जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे ....

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
 हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
 साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे
 जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे....

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
 तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना....
 धमन्यांतल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
 सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे
 जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे....

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
 नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
 पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
 जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे.


प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.