⚜️जय भारता जय भारता⚜️

 ⚜️जय भारता जय भारता⚜️


जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता

तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता

बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता

ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित्‌ तारता

गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.