⚜️निस्वार्थी जगणे⚜️
सांयकाळी समुद्रकाठी फिरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किना-यावर काहीतरी उचलून समुद्रात फेकताना पाहिलं आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफडणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फेकत होता.
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ? मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फरक पडणार आहे?"
त्या मुलाने आणखी एक मासासमुद्रात फेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फरक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, "त्याला काय फरक पडला ?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.
तात्पर्यः- आयुष्य असचं जगायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं.