⚜️तिरंगी झेंडा⚜️
तिरंगी झेंडा हा अमुचा, गगनामध्ये फडफडलो,
वाऱ्यावरती हा डुलतो. आम्ही लेकरे हिंदभूमीची,
वंदन झेंड्याला करीतो ॥धृ॥
वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग खुले,
अन चक्र शोभते मध्ये निळे,
सत्य शांती हा शिकवितो ॥१॥
भारत आमुचा सुंदर देश, गंगायमुना यांचा देश
संत महात्मे यांचा देश, आम्ही लेकरे या देशाची
वंदन देशाला करितो,
वंदे मातरम्, बंदे मातरम् ॥२॥