⚜️मला हे दत्तगुरु दिसले⚜️
ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले
मला हे दत्त गुरु दिसले ॥धृ॥
माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी
कृतज्ञतेचे श्वान विचारे, पायावर झुकले ॥१॥
तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमचे अवती माझे भवती, औदुंबर वसले ॥२॥