⚜️वृक्षारोपण...घोषवाक्ये⚜️
झाडे लावा घरीदारी
तीच आपली दौलत खरी
आता करा एकच चळवळ
लावा वृक्ष करा हिरवळ
शिकून घ्या वृक्ष संवर्धनाचे तंत्र
प्रगतीसाठी हाच खरा मंत्र
राखा पर्यावरणाचा समतोल
जाणा वृक्षरोपणाचे मोल
झाडावर कराल माया
तर मिळेल थंडगार छाया
एक दोन तीन चार
झाडे देतात सावली गार
वनीकरणाचा अविष्कार
अन दुष्काळावर बहिष्कार
एक दोन तीन चार
झाडे लावा फार फार
कावळा करतो काव काव
म्हणतो माणसा झाड लाव
देश की धरती करे पुकार
बच्चे कम हो पेड हजार
भल्या माणसा आळस झाड
आपल्या अंगणात लाव झाड
नको दुष्काळ अन् जमिनीची धूप
त्यासाठी झाडे लावा खूप खूप
झाड तेथे पाखरू
धरतीचे लेकरू
झाडाचे रक्षण
सुसंस्कृतपणाचे लक्षण
वेद पुराण देती प्रमाण
वृक्षाविना नाही कल्याण
झाडे लावा झाडे जगवा
प्रदूषणापासून मुक्ती मिळवा
सुखी आयुष्याची शिदोरी
वृक्ष लावा दारोदारी
वृक्ष लावूया घरोघरी
पर्यावरण राखूया गावोगावी
झाडे लावा ठाई ठाई
मिटून जाईल पाणी टंचाई
वृक्षारोपण धर्म महान
एक वृक्ष दशपुत्र समान
झाडे कशासाठी
आपल्या आरोग्यासाठी
पाणी आडवा पाणी जिरवा
झाडे लावा झाडे जगवा
माकडा माकडा हूप हूप
झाडे लावा खूप खूप
झाडे हीच आपले मित्र
उभारू नका त्यांच्यावर शस्त्र
हिरवी हिरवी गार गार
झाडे लावू चार चार
हाक देते धरणी आई
जतन करूया वनराई
हवी असेल पर्जन्यवृष्टी
तर वृक्षांनी सजवा सृष्टी
वनीकरणास साथ द्या
गावाच्या विकासाला हात द्या
वृक्ष लाऊ घरोघरी
औषधे मिळतील गुणकारी
वृक्ष लावा दारोदारी
समृद्धी येईल घरोघरी
झाडे लावा झाडे जगवा
मिळेल शुद्ध ताजी हवा
आता आमचे एकच लक्ष
लावूया अगणित वृक्ष
कराल वृक्षांवर माया
तर मिळेल थंडगार छाया
एक विचार एक निर्धार
थांबवूया झाडांचा संहार
झाडे आहेत कल्पतरू
संरक्षण त्यांचे नित्य करू
झाडांची ही किमया महान
मानवास देई जीवनदान
संकल्प करूया वृक्षसंवर्धन
सृष्टी होईल नंदनवन