⚜️कुत्र्याची हुशारी⚜️

 ⚜️कुत्र्याची हुशारी⚜️

       एका माणसाने एक कुत्रा पाळला होता. तो अतिशय प्रामाणिक होता.तो मालकाच्या घराचे चांगल्या प्रकारे रक्षण करीत असे. एका रात्री चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला.त्याच्या आवाजाने चोर घाबरून पळून गेला. कुत्र्याच्या भुंकण्याने मालक जागा झाला.त्याने सर्व ठिकाणी हिंडून शोध घेतला. परंतु चोर असल्याचं त्याला कोणतच चिन्ह दिसलं नाही. त्याने आपल्या कुत्र्याला झोप मोडल्याबद्दल काठीने मारले. काही दिवसानंतर चोर पुन्हा चोरीच्या उद्देशाने आला.यावेळेस मात्र कुत्रा त्याला पाहून भुंकला नाही. उलट अतिशय शांतपणे तो चोर काय करतो आहे, याचे निरीक्षण करीत होता.चोराने घरातील मौल्यवान वस्तू चोरल्या. त्या सर्व एका गाठोडीत बांधल्या.जवळच असलेल्या एका झाडाखाली खणून ती गाठोडी तेथे पुरून ठेवली. कुत्रा हे सर्व पाहात होता. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर मालकाला पश्चाताप झाला. कुत्र्याला मारल्याबद्दल कुत्र्याची माफी मागितली. परंतु तो प्रामाणिक कुत्रा मालकाला चोराने गाठोडी लपविली होती तेथे घेऊन गेला. पायाने माती बाजूला करून त्याने गाठोडी मालकाला दिली. आपले धन परत मिळाल्याबद्दल मालकाला खूप आनंद झाला. त्याने कुत्र्याचे आभार मानले.

तात्पर्य :- संयमाने कोणतीही गोष्ट केली तर त्याचे फळ निश्चित चांगले मिळते.