⚜️उतारा वाचन भाग ७६⚜️
दिवाळीचा सुट्टी सपली, तशी शाळा उघडण्याची लगबग चालू झाली. सुट्टीत मामाच्या गावी खूप मजा आली. तेथील निसर्ग पाहून तर शहरात यावेसेच वाटत नव्हते. पण शाळाही महत्त्वाची. सुट्टीत दिलेला अभ्यासही पूर्ण झाला होता. दप्तर भरुन शाळेत जाण्यास सज्ज झालो. शाळेतील अभ्यासाबरोबर वर्ग सवंगडी, जेवणाची मधल्या सुट्टीतील धमाल, खेळ सगळे कसे वाट पहात असतील या आठवणीतच कधी रमून गेलो ते कळलेच नाही.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) कोणत्या सणाची सुट्टी संपली होती ?
३) सुट्टीत कोणत्या ठिकाणी खूप आनंद झाला ? ं
२) कशाची लगबग सुरु झाली ?
४) लेखकाला शहरात का यावेसे वाटत नव्हते ?
५) लेखकाने सुट्टीत दिलेला काय पूर्ण केला होता ?
६) लेखकाच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे ?
७) काय भरून लेखक शाळेत जाण्यास सज्ज झाला ?
८) लेखकाची कोण वाट पाहत होते ?
९) लेखक कोणत्या आठवणीत रमले ?
१०) 'सवंगडी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांग.
११) 'सज्ज होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.
१२) उताऱ्यातील जोडाक्षरे लिही.
१३) शेवटी 'ळ' येणारे शब्द लिही. उदा. खेळ
१४) सारखी अक्षरे जोडून येणारे जोडाक्षरयुक्त शब्द लिही. उदा. सज्ज, टम्म
१५) 'माझी शाळा' या विषयावर दहा ओळी लिही.