⚜️उतारा वाचन भाग ८२⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ८२⚜️

     वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची उत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरून आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर Tiger असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात पटाईत आहे. वाघाच्या पिल्लाला बछडे म्हणतात. वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. तो हरिण, सांबर, रानडुक्कर, पक्षी, ससा या सारख्या प्राण्यांचे भक्षण करतो आणि त्यांना आपले खाद्य बनवतो.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१२) कोणता प्राणी हा मांजर कुळातील म्हणून ओळखला जातो ?
१) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
(३) अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान कोणता प्राणी भूषवतो ?
४) वाघ या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दावरुन आली आहे ? 
५) इंग्रजीत वाघाला काय म्हणतात ?
६) मराठीत भल्या मोठ्या वाघाला काय म्हणतात ?
७) पूर्णपणे मांसाहारी प्राणी कोणता ?
८) वाघ कोणत्या प्राण्यांचे भक्षण करतो ?
९) वाघ काय करण्यात पटाईत आहे ?
१०) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
११) उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द शोध व लिही. 
१२) उताऱ्यात कोणत्या प्राण्याची माहिती आलेली आहे ?
१३) 'वाघ' या प्राण्यांविषयी तुला असलेली माहिती लिही.
१४) वाघ कोठे राहतो ?
१५) वाघाची विविध प्रकारची चित्र जमव व त्याची एक संग्रह वही तयार कर.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421