⚜️जीवनाचे सत्य⚜️
मनोहर पर्रीकर गेले, सुषमाजी गेल्या, जेटली गेले, झुनझुनवाला गेले. या सर्व घटनांमधून आपण काय शिकलो, या सर्वांचा मृत्यू म्हातारपणाने झाला नाही, ते सर्व कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या आहारात कोणतीही कमतरता असेल,आपण म्हणू शकत नाही. जगातील सर्व सुखसोयी, चोवीस तास उत्तम वैद्यकीय सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, मग असे काय झाले की त्यांचे अकाली निधन झाले.
सत्य हे आहे की, या शरीराचे दोन खूप मोठे शत्रू आहेत.
- एक खूप शारीरिक विश्रांती आणि दुसरी खूप चिंता किंवा खूप मानसिक थकवा.
फक्त या गोष्टींपासून स्वतःला वाचवा, आयुष्यात कधीही गंभीर आजार होणार नाही.
सततची औषधे, चाचण्या, दवाखाने, डॉक्टर, उपचार, ऑपरेशन्स या चक्रव्यूहात अडकू नका.
hospital is for business not for your health. रुग्णालय हे व्यवसायासाठी आहे, तुमच्या आरोग्यासाठी नाही. रुग्णालयात आरोग्य मिळाले असते, तर हे सर्व मोठे नेते हयात असते.
कधीही कोणासाठी भूक, तहान विसरून काम करू नका. अगदी तुमच्या मुलांसाठीसुद्धा, कारण तुमचे शरीर निरोगी असेल, तर तुम्ही आहात आणि तुम्ही असाल, तर तुम्ही त्यांनाही साथ देऊ शकता.
प्रत्येक जण स्वतःचे नशीब आणि कौशल्य घेऊन आलेला असतो. म्हणून कोणासाठी जास्त काळजी करू नका, इच्छांना अंत नसतो, म्हणून समाधानी राहायला शिका.
जीवनात पद ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमचे स्वतःचे शरीर तुमचे शरीर जोपर्यंत निरोगी आहे तोपर्यंत तुमचे महत्त्व आहे. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना. जोपर्यंत तुमचे शरीर निरोगी आहे. तोपर्यंत तुमचे जीवन सार्थक आहे.