⚜️सत्संगत⚜️

 ⚜️सत्संगत⚜️

     बिरबलाची मुलगी एक दिवस वडिलांबरोबर राजदरबारात गेली तिचे वय होते अवघे पाच वर्षाचे.
अकबर बादशहाने तिला प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले "तुला बोलता येते का?"
मुलीने उत्तर दिले
"थोडे फार "
विचारले, “थोडे फारचा अर्थ काय?”
ती म्हणाली, “मोठ्यांपेक्षा मी थोडे व छोट्यांपेक्षा फार माझ्या बोलण्याचा अर्थ. म्हणून मी थोडेही बोलते व पुष्कळही बोलते."
बादशहाने खूष होऊन तिला बक्षीस दिले व शेरा मारला " आहे कोणाची? बिरबलाची. संगतीचा असा प्रभाव असतो.”

तात्पर्य :- संस्कार व संगत चांगली असल्यास आपले जीवनही संपन्न बनत जाते.