⚜️चला फराळ करुया दिवाळीचा⚜️

⚜️चला फराळ करुया दिवाळीचा⚜️

दिवाळीत सर्वांनी.खूप मजा केली. आता चला दिवाळीचा फराळ खाऊया.   
  खाली दिलेल्या वाक्यांमधील अक्षरांची योग्य जुळवा जुळव करून आपल्याला गोड गोड पदार्थ शोधून काढायचेत बघा तुम्हाला किती सापडतात...

उत्तरसूची

1) विलास जेवल्याबरोबर डाराडूर झोपू नये रे

उत्तर :- लाडू

2) करंडकावर आजीमाजी खेळाडूंच्या सह्या आहेत.

 उत्तर :-  करंजी

3) सोपेच प्रश्न जरा अवघड पध्दतीने काढायचेत.

उत्तर :- पेढा

4) बड्या बिल्डरने एकतर्फी व्यवहार करून फसविले.

उत्तर :- बर्फी

5) खर तर मुलांवर वसकन ओरडायची गरज नव्हती.

उत्तर :-खरवस

6) सखी शेजारणी तू हसत रहा हसत रहा

उत्तर :-खीर

7) घार उंच ढगात गेली तरी लक्ष पिलांपाशीच असते खाली.

 उत्तर :- घारगे

8) प्यारे मोहन जरा चाय बनालो अदरक डालके

उत्तर :- मोदक

9) बागेतल्या इतक्या सुंदर फुलांमधून अगदी मोगराच आवडला सुंदरीला.

उत्तर :- बासुंदी

10) श्रीमान योगीचे सर्व खंड प्रसिध्द आहेत.

 उत्तर :- श्रीखंड

11) लठ्ठ पणावर उपाय भरपूर आहेत पण समजून घेतले तर ना

उत्तर :- पायसम

12) गुलाब पुष्प प्रदर्शन बघायला मला जाम आवडते 

उत्तर :- गुलाबजाम

13) मांडवी नदीवर दोन जहाजे डेरेदाखल झाली आहेत.

उत्तर :-मांडे

14) मुलांनो कानगोष्टी खेळ आवडला असेल तर परत खेळूयात.

उत्तर :-कानवला

15) अजितची काल जुजबी चौकशीचे करून पोलीसांनी सोडून दिलयं.

उत्तर :- जिलबी

16) सुरतला जाणार असाल तर कापडे,साड्या आणि गोव्यावरून फेणी आणायला विसरू नका

उत्तर :- सुतरफेणी

17) कडक उन्हात कबूतरे वळचणीला बसली होती.

उत्तर :- कडकणी

18) कोकण सहल ठरली बरंका परवा निघूयात लवकर

उत्तर :- हलवा

19) आम जनतेला निवडणुकीत आता जास्त रस वाटू लागला आहे.

 उत्तर :- आमरस

20) रश्मीला संबळपूरी साडी जास्त आवडते,नेहमी नेहमी तिच नेसते

उत्तर :- रसपुरी