⚜️उतारा वाचन भाग ७८⚜️
भारतीय लोक नदीला माते समान मानतात. गोदावरी ही भारताची महत्त्वाची नदी आहे. गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे झाला. महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नदी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यातून वाहत आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते. इंद्रावती, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा, प्राणहिता, दारणा, प्रवरा, कादवा या गोदावरीच्या प्रमुख उपनदया आहेत. गोदावरी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी व जीवनदायिनी आहे.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) भारतीय लोक कोणाला मातेसमान मानतात ?
२) भारताची महत्त्वाची नदी कोणती ?
३) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
४) महाराष्ट्रातून वाहताना गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते ?
५) गोदावरी नदी वाहताना महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात प्रवेश करते ?
६) गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या ?
७) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
८) कोणत्या नदीला महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणतात ?
९) ब्रह्मगिरी येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे ?
१०) 'पैनगंगा' या शब्दात आणखी कोणत्या एका नदीचे नाव लपले आहे ?
११) 'जीवनदायिनी' या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
१२) 'जीवनदायिनी' या शब्दात 'आयुष्य' या शब्दासाठी आलेला शब्द शोध.
१३) 'गोदावरी ही भारताची महत्त्वाची नदी आहे.' या वाक्यातील नाम ओळख.
१४) 'गोदावरी' या शब्दाचा वापर करुन पाच वाक्य बनव.
(१५) तुला माहित असलेल्या नद्यांची नावे लिही.