⚜️गणितातले आकडे⚜️
गणितातले आकडे
झाले एकदा वाकडे
एकाला फुटले डोके
दोन म्हणाले ओके
तीनचा आकुट थाट
चारच्या पोटात गाठ
पाचला एकच पाय
सहाला उंचीचे नाय
सातची कुबडी पाठ
नाकात आडवा आठ
नऊचा डोळा गोल
दहाचा वेगळा तोल
प्रत्येकाची ऐट खुप
वेगळे तरी एकच रंगरुप