⚜️टेलिफोन⚜️

 ⚜️टेलिफोन⚜️

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग टेलिफोन 
हॅलो मिस्टर बोलतय कोण 
हा तर आमच्या बाबांचा फोन
 बाबा, बाबा लवकर या, 
येताना मला खाऊ आणा 
गोळया बिस्किट नको मला 
पाटी पेन्सिल हवी मला 
पाटी पेन्सिल घेईन 
धडा पहिला गिरवीन 
पहिला नंबर मिळवीन