⚜️जीवन⚜️
जीवन म्हणजे खेळ नव्हे, फुकट दवडण्याचा वेळ नव्हे.
जीवन हे कोडे आहे, सोडवाल तेवढे थोडे आहे.
जीवन म्हणजे पैसा आहे, मिळवाल तेवढा थोडा आहे.
जीवन हा संघर्ष आहे, रडत बसाल तर व्यर्थ आहे.
जीवन म्हणजे कट कट आहे, उन्हाळ्यातील रणरण आहे.
जीवन म्हणजे आनंद आहे, सुखसमाधानाचे आगार आहे.
जीवन म्हणजे विश्वास आहे परस्परांचा आधार आहे.
जीवन ही भक्ती, देवाने दिलेली शक्ती आहे.
या शक्तीचा उपयोग करा, जीवनाचे शिल्पकार व्हा.